मान्सून 24 तासात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

यावर्षी मान्सून ने लवकरच भारतामध्ये हजेरी लावलेले आहे येत्या 24 तासांमध्येच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नेहमी सात जून रोजी मान्सून हा भारताच्या केरळ राज्यांमध्ये दाखल होतो आता तो लवकरच म्हणजे एक आठवड्या आधीच केरळमध्ये दाखल झालेला आहे तसेच हवामान खात्याने देखील यावर्षी चांगला पाऊस होणार आहे असा अंदाज वर्तवला आहे.

यावर्षी मान्सून लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तांदूळ मका कापूस सोयाबीन आणि ऊस यांसारख्या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून चांगला ठरणार आहे.

मान्सून ऋतूवर देशाची सुमारे 3 ट्रिलियन अर्थव्यवस्था आधारित आहे भारताला शेतांना पाणी देण्यासाठी आणि जलाशय आणि जलचरांचे संगोपन करण्यासाठी भारतामध्ये जवळपास 70 टक्के पाऊस पडण्याची आवश्यकता असते.

भारतातील जवळ जवळ सर्वच शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित आहे त्यामुळे भारतात पावसावर आधारित पिके घेतली जातात यावर्षी मान्सून पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 106% अपेक्षित आहे.

Leave a Comment